Ad will apear here
Next
‘सहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य’ या पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई :
‘सहकारी बँकांचा सीईओ – एक आर्य चाणक्य’ या अंजली प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन १९ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले. किरण कर्नाड यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ‘दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या वेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रमाकांत खेतान, इतर संचालक आणि राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड उपस्थित होते.
 
पुस्तक प्रकाशनानंतर अनास्कर यांनी या पुस्तकासंबंधीचे विचार व्यक्त केले. ‘अशा पुस्तकाची सहकारी बँकिंग क्षेत्राला फार आवश्यकता होती. नागरी सहकारी बँकांच्या विकासात आज मुख्यतः बँकांच्या सीईओवरच मदार आहे. बँकांची केवळ संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक विकासही झाला पाहिजे आणि त्यायोगे एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये असलेली नागरी सहकारी बँकांची टक्केवारी वाढली पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारच्या उपयुक्त पुस्तकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,’ असे ते म्हणाले.
‘किरण कर्नाड यांना सहकार आणि बँकिंग विषयात विशेष अनुभव आणि आस्था आहे. तसेच एखादी गोष्ट पटेल अशी त्यांच्याच शब्दात समजावून सांगणे, ती समर्पक शब्दांत व्यक्त करणे यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना चांगली लेखनकलाही अवगत आहे. नागरी सहकारी बँकांबरोबरच, पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांचे उच्चपदस्थ अधिकारी यांना हे पुस्तक उपयुक्त आहे असे मला वाटते,’ असेही अनास्कर यांनी आवर्जून नमूद केले.

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवता येऊ शकते.)

(या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZPJBG
Similar Posts
सहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य भारताच्या इतिहासात आर्य चाणक्याचं स्थान मोठं आणि योगदान अभूतपूर्व! त्यानं आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि त्याच्या विलक्षण नीतिनियमांनुसार मौर्य साम्राज्याचा भारतभर विस्तार केला आणि म्हणून त्याची नीतिसूत्रं ‘चाणक्यनीती’ म्हणून प्रसिद्ध झाली. किरण कर्नाड यांना चाणक्याची नीती आणि गुण अंगी असणारा सहकारी बँकांचा
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language